Ad will apear here
Next
कवी, लेखक जगदेव भटू यांना राष्ट्रीय समाजगौरव पुरस्कार जाहीर
१५ सप्टेंबरला नवी दिल्लीत होणार प्रदान
भिवंडी : नवी दिल्लीतील डॉ. विशाखा सोशल वेल्फेअर फाउंडेशन तथा आदीलीला फाउंडेशन यांच्या वतीने कवी, लेखक जगदेव भटू यांना यंदाचा राष्ट्रीय समाजगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. १५ सप्टेंबरला नवी दिल्लीत अखिल भारतीय प्रतिभा साहित्य संमेलनात मान्यवरांच्या हस्ते भटू यांना हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.

या संस्थेच्या वतीने दर वर्षी विविध क्षेत्रांतील प्रतिभावंतांना, उल्लेखनीय काम करणाऱ्यांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात येते. या वर्षी जगदेव भटू यांना हा मान मिळाला आहे. 

जगदेव भटू हे भिवंडी तालुक्यातील शेलार येथे राहत असून, गेल्या २५ वर्षांपासून विविध विषयांवर लेखन करत आहेत. आतापर्यंत त्यांची एकूण तीन पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांचा सामाजिक, तसेच इतर विविध क्षेत्रांमध्ये नेहमीच सहभाग असतो. विविध साहित्य संमेलने, कविसंमेलनांतून आणि सामाजिक कार्यक्रमांतून ते आपल्या कवितेच्या माध्यमातून समाज प्रबोधन करत असतात. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार दिला जाणार आहे. 

ज्येष्ठ साहित्यिक शुक्राचार्य गायकवाड, श्रीकृष्ण टोबरे, शिवा इंगोले, विजयकुमार भोईर, वि. जी. पवार, युवा कवी मिलिंद जाधव, मारुती कांबळे, संघरत्न घनघाव, एम. के. वाघ यांनी त्यांचे अभिनंदन केले असून, विविध ठिकाणांहून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/AZPHCD
 जगदेव सर, साहित्याच्या काटेरी दालनात आपल्या यशस्वी वाटचालीस मंगलमय शुभेच्छा. यापुढे जबाबदारी ची जाणिव ठेऊन आपल्या हातून अजून क्रांतिकारी साहित्य निर्माण होईल ही अपेक्षा ॥ मच्छिंद्र वाघ, धुळे ॥1
Similar Posts
ठाणे जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद सदस्यपदी शिवसेनेचे प्रकाश भोईर भिवंडी : भिवंडी पंचायत समितीमधील सदस्य व माजी उपसभापती प्रकाश भोईर यांची ठाणे जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद सदस्यपदी निवड करण्यात आल्याने सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे.
सुरेश म्हात्रेंचा वाढदिवस ‘मातोश्री’मध्ये साजरा भिवंडी : शिवसेना ठाणे जिल्हा ग्रामीणचे संपर्कप्रमुख, परिषदेच्या आरोग्य व बांधकाम समितीचे सभापती तथा गटनेते सुरेश गोपीनाथ म्हात्रे ऊर्फ बाळ्या मामा यांनी आपला वाढदिवस खडवली येथील वृद्धाश्रमात सपत्नीक साजरा केला. या वेळी या आश्रमातील वृद्धांशी मनमोकळ्या गप्पा मारून व सहभोजन करत त्यांचा आशीर्वाद घेतला.
भिवाळी येथे जागतिक आदिवासी दिवस भिवंडी : तालुक्यातील भिवाळी (गणेशपुरी) येथे उद्या (नऊ ऑगस्ट) जागतिक आदिवासी दिवसाचे आयोजन भिवाळी-उसगाव येथील आदिवासी क्रांतिवीर राघोजी भांगरा सामाजिक संस्थेतर्फे करण्यात आले आहे.
भादाणे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी उर्मिला भालेकर भिवंडी : राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या व पाच गावांमध्ये विस्तार असलेल्या भादाणे ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शिवसेनेच्या उर्मिला रमेश भालेकर यांची आठ जानेवारी २०१९ रोजी बिनविरोध निवड करण्यात आली.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language